सिल्व्हर झोन टॅलेंट हंट परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलचे यश

By Admin | Updated: July 19, 2015 02:35 IST2015-07-19T02:35:01+5:302015-07-19T02:35:01+5:30

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर झोन टॅलेंट हंट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

Yavatmal Public School's success in the Silver Zone Talent Hunt examination | सिल्व्हर झोन टॅलेंट हंट परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलचे यश

सिल्व्हर झोन टॅलेंट हंट परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलचे यश

यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर झोन टॅलेंट हंट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहे.
वर्ग तीनचा विद्यार्थी अरमान शेंडे, चौथीचा शिरीष कटकतलवारे, पाचवीचा अमन दर्डा, सहावीची विद्यार्थिनी श्रुती भेंडारकर, सातवीचा विद्यार्थी चिन्मय संभे, आठवीचा श्रेयश साबू आणि नववीचा विद्यार्थी सौरभ ठोकाडे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिसऱ्या वर्गाचा तन्मय नागपाल, चौथीची आर्या तोटे, सहावीचा अथर्व कोरडे, सातवीची सिया बोरले, आठवीचा अनिरुद्ध जाधव, नववीचा अनिकेत राठोड या विद्यार्थ्यांनी रजत पदक मिळविले.
वर्ग तीनचा विद्यार्थी आर्यन भोयर, आठवीतून अभिजित चोखाणी यांनी कांस्य पदक प्राप्त केले. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे परीक्षा विभाग प्रमुख अजय सातपुते, साक्षी नागवाणी, विद्या राजगिरे, नीलम शर्मा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: Yavatmal Public School's success in the Silver Zone Talent Hunt examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.