यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:42 PM2020-07-31T13:42:35+5:302020-07-31T13:42:55+5:30

महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले.

In Yavatmal, other employees got angry as ST employees came out positive | यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त

यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले. पूर्वसूचना देऊनही महामंडळाकडून उपाययोजना झाली नसल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने यवतमाळ, पांढरकवडा, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद या शहरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याच्या सूचना आहे. यानुसार यवतमाळ विभागात एसटी बसेस बंद आहेत. कार्यालयीन कामकाज कर्मचारी मयार्देनुसार सुरू ठेवावे, शिवाय वर्क फ्रॉर्म होमचा पर्याय दिलेला आहे. या सर्व बाबी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकांना पत्र देऊन सूचित केल्या होत्या. याची दखल घेतली गेली नाही.

विभागीय कार्यालयात जवळपास शंभर कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांनी निवेदनातून हा प्रश्न मांडला होता. गुरुवारी विभागीय कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. ही माहिती कळताच कर्मचारी सतर्क झाले. शुक्रवारी कार्यालयात पोहोचताच सर्व जण बाहेर निघाले. अधिकाºयांनी निवेदनाची दखल घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: In Yavatmal, other employees got angry as ST employees came out positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.