Maharashtra Grampanchayat Election; यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 12:36 IST2021-01-18T12:36:25+5:302021-01-18T12:36:46+5:30
Yawatmal news आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने शेख इसाक भाग्यवंत ठरले.

Maharashtra Grampanchayat Election; यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ८.३० वाजतापासून तालुका स्तरावर सुरुवात झाली. उमेदवारांचे निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांमधून प्रचंड जल्लोष केला जात होता. आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने शेख इसाक भाग्यवंत ठरले.
मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला. दुपारी १२ वाजतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नेते मंडळी आपलेच वर्चस्व राखण्यात यशस्वी झाले.