शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ विकासाच्या मार्गावर; विमानतळाचे भवितव्य बदलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:03 IST

Yavatmal : उद्योग-व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती. मात्र, येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उद्योग-व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती. मात्र, येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिले. त्यामुळे येथील व्यवसाय-उद्योगाला जो फायदा मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. विकासासाठी यवतमाळकरांना ताटकळत राहावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या नेमक्या भावना समजून घेत विमानतळ कार्यान्वित करण्यासह यवतमाळला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे ठाम आश्वासन डॉ. विजय दर्डा यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांच्या नागपूर येथील 'यवतमाळ हाऊस' येथे भेट दिली. यावेळी डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यवतमाळ येथील विमानतळाच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडला. तसेच विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आग्रहाची विनंती केली. विमानतळाची धावपट्टी सध्या २१०० मीटर आहे. यावर ७० आसन क्षमता असलेले एटीआर विमान दिवसा उतरविता येते. ही धावपट्टी २४२० मीटरपर्यंत वाढविली तर बोईंग विमान दिवसा उतरविता येऊ शकते. आवश्यक वीज यंत्रणा बसविल्यास नाईट लँडिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.

या बरोबरच विमानतळावरील कंट्रोल पॉवर बिल्डिंगसह टर्मिनल बिल्डिंग तसेच अॅप्रोल एरिया विकसित करण्यासह अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्याच्या मुद्याकडे डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. विमानतळ सुसज्ज झाल्यास याचा उपयोग पायलट प्रशिक्षणासाठी (एव्हिएशन एज्युकेशन) होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. यवतमाळच्या विमानतळाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, त्याची काळजी करू नका, यवतमाळच्या विकासाचा शब्द मी दिला आहे, तो पाळला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर डॉ. विजय दर्डा यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही आठवण करून दिली की, यवतमाळच्या विमानतळाकडे जातीने लक्ष देणार असल्याचे आपण कबूल केले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उदय सामंत यांनी यवतमाळचे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्याची आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल डॉ. दर्डा यांनी त्यांना धन्यवादही दिले. यावर उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, यवतमाळच्या विमानतळासंबंधी आमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. तुमच्या मागणीप्रमाणे विमानतळाच्या विकासाचे संपूर्ण काम आम्ही करणार आहोत.

हाच विषय उद्योगमंत्री सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला असता, यवतमाळच्या विमानतळाला बाबूजींचे नाव दिलेले आहे, त्यामुळे या विमानतळाच्या विकासाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

'एमएडीसी'कडे ताबा आल्याने वाढल्या अपेक्षा

उद्योगमंत्री असताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी राज्यातील मागास जिल्ह्यात औद्योगीकरण वाढविण्यासाठी संबंधित जिल्ह्यात विमानतळाची गरज व्यक्त करून तसे धोरण आणले होते. यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापसाची २ पंढरी अशी आहे. यवतमाळ येथे हवाईसेवा सुरू झाल्यास उद्योग-व्यवसायाला गती मिळेल, या अपेक्षेने बाबूजींनी कठोर परिश्रम घेऊन यवतमाळमध्ये हे विमानतळ उभारले.

प्रारंभी महाराष्ट्र औद्योगिक विकास 5 महामंडळाकडे असलेले हे विमानतळ २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हल्पमेंटकडे गेले. मात्र, रिलायन्सकडून देखभाल-दुरुस्तीसह विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने तब्बल १५ वर्षांनंतर राज्य शासनाने हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेतले. त्यानंतर ८ एप्रिल २०२५ पासून हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. आता हे विमानतळ कधी कार्यान्वित होते, याची यवतमाळकरांना उत्सुकता लागली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal Airport revival assured, paving the way for regional development.

Web Summary : CM assures Yavatmal airport revival, boosting business and jobs. Dr. Darda highlighted the need for upgrades, including runway extension and night landing facilities. The government aims to develop the airport, potentially for pilot training, fulfilling Babuji's vision for regional growth.
टॅग्स :YavatmalयवतमाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंत