शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा, अपघातांचं वाढलं प्रमाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 10:39 IST

नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे.

अविनाश खंदारे यवतमाळ - नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस दिसत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. उमरखेड शहरातील रस्ते अतिशय अरूंद आहे त्यातच अनेक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील मुख्य चौक अरुंद रस्त्यांनी जोडलेले आहेत. परिणामी चौकात येणाऱ्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होते. शहरात असणाऱ्या काही मुख्य रस्त्यांना दुभाजक लावले आहेत. परंतु या रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडुन बसलेली असतात या जनावरामुळे दिवसागणिक छोटे मोठे अपघात होतात.

शहरातील माहेश्वरी चौक गायत्री चौक बसस्थानक चौक नगर परिषद गार्डन परिसर महागांव रोड नांदेड रोड ढाणकी रोड पुसद रोड आदी ठिकाणी  फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली जागा हातगाड्यांवाल्यांनी काबीज केली आहे. संभाजी उद्यान ते माहेश्वरी चौक यांना जोडणाऱ्या बोळवजा अरूंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी असताना अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने तिथे उभे केली जातात. तसेच माहेश्वरी चौकाच्या तिहरी वळणावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. हा सर्व प्रकार पोलिसांना माहीत आहे परंतु पाणी कुठे मुरते हेच समजत नाही अशा स्थितीत वाहतूक पोलीस गप्प का असा प्रश्न आहे.

शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पेट्रोल पंपापासून विश्राम गृहापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. ऐन संध्याकाळी वाहनांची संख्या वाढते तसेच नागरीक ही रस्त्यावर दिसतात. त्यामुळे संध्याकाळी ७ते रात्री ९ वाजेपर्यत रस्ता पार करने धोक्याचे झाले आहे शहरात पार्किगचा अभाव असल्याने अनेक वाहनेही अस्ताव्यस्त उभी असतात त्याचाही फटका वाहतुकीला बसत आहे.वाहतूक पोलीस नावालाच उमरखेड शहरात माहेश्वरी चौक पुसद रोड महागांव रोड नांदेड रोड ढाणकी रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती असते. परंतु शहरातील विस्कटलेली वाहतूक सुरळीत करण्यात कोणताही हातभार लावला जात नाहीत. शहरात अनेक तरुण सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यांनाही वाहतूक पोलिसांकडून अटकाव केला जात नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस