शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पावणेतीन लाख रुपये लुटले

By विशाल सोनटक्के | Updated: March 17, 2023 21:01 IST

यवतमाळच्या मध्यवर्ती सराफा लाईनमधील धक्कादायक घटना

यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. शुक्रवारी बॅंकेतून रोकड घेवून मुलासह दुचाकीवरून निघालेल्या एकाचे दोन लाख ७६ हजार रुपये दिवसाढवळ्या हिसकावून पळ काढल्याची घटना शहरातील मध्यवर्ती भागातील सराफा लाईनमध्ये घडली. या धक्कादायक प्रकारामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

माळीपुरातील बाफना दालमीलजवळ राहणारे लक्ष्मीनारायण राधेश्याम प्रताप हे पीएनजी कंपनीमध्ये ड्राव्हर म्हणून काम करतात. त्यांनी सध्या घराचे बांधकाम काढले आहे.  शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास श्याम टॉकीजजवळील पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुख्य शाखेत ते पैसे काढण्यासाठी मुलगा सागरसह दुचाकीवरून आले होते. बॅंकेतून दोन लाख ७६ हजार रुपयांची रक्कम काढून त्यांनी ते कपड्याच्या लाल पिशवीमध्ये ठेवली आणि दुचाकीवरून ते मुलासह माळीपुरातील घराकडे निघाले.

सराफा लाईनमधील महाकाली ज्वेलर्स समोरुन ते जात असताना श्याम टॉकीजकडून काळ्या रंगाच्या होंडा युनिक मोटारसायकलवरून भरधाव वेगाने दोघे आले. त्यातील समोर बसलेल्या इसमाने काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते. तर दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाच्या डोक्यावर काळ्या रंगाची टोपी होती. ३५ वयोगटातील या तरुणांनी भरधाव वेगात येवून लक्ष्मीनारायण प्रताप यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे बॅलन्स सांभाळत मुलाने पाय टेकवून गाडी उभी केली असता दुचाकीवरील भामट्याने दोन लाख ७६ हजार रुपये असलेली पिशवी हिसकावून बालाजी चौकाकडे पळून गेले. या घटनेनंतर लक्ष्मीनारायण प्रताप यांनी आरडाओरड केली. तर मुलगा सागर याने गाडीचा पाठलाग केला. परंतु भरधाव वेगाने दोन्ही भामटे पसार झाले. त्यानंतर प्रताप यांनी मुलासह पोलिस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली.जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक धास्तावले दुचाकीवरून येवून दोन लाख ७६ हजारांची रक्कम भामट्याने पळविली. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास सराफा लाईनमध्ये घडली. सकाळी ११.३० च्या सुमारास साधारणपणे सर्व व्यवहार सुरू झालेले असतात. त्यातच  सराफा लाईन हा भाग शहरातील मध्यवर्ती म्हणून ओळखला जाताे. अशा ठिकाणी पाळत ठेवून भरदिवसा लुटमारीची घटना होत असल्याने शहरवासीयात धास्तीचे वातावरण आहे. चार दिवसांपूर्वीच मारेगाव येथे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर यवतमाळ शहरात ही घटना घडल्याने वाढत्या गुन्हेगारीबाबत शहरवासीयातून चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी