यवतमाळ नगरपरिषदेने वेतन अनुदानाचे एक कोटी थकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:06+5:30
यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेतन वेळेत होतात. परंतु आॅक्टोबर २०१९ पासून यवतमाळ नगरपरिषदेने २० टक्के रकमेचे हे सहायक अनुदान अंदाजे एक कोटी रुपये फेब्रुवारी उजाडूनही जारी केलेले नाही.

यवतमाळ नगरपरिषदेने वेतन अनुदानाचे एक कोटी थकविले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दिले जाणारे सहायक अनुदान यवतमाळ नगरपरिषदेने गेल्या चार महिन्यांपासून थकविल्याने विद्यमान शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत सापडले आहे. त्यांना या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला २७ - २८ तारखेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेतन वेळेत होतात. परंतु आॅक्टोबर २०१९ पासून यवतमाळ नगरपरिषदेने २० टक्के रकमेचे हे सहायक अनुदान अंदाजे एक कोटी रुपये फेब्रुवारी उजाडूनही जारी केलेले नाही. त्यामुळे वेतन व निवृत्ती वेतनात अडथळे निर्माण होत आहे. काही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी अलिकडेच पालिका मुख्याधिकाºयांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या. मुख्याधिकाºयांनी यापुढे अनुदान व पर्यायाने वेतन वेळेत होईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही सहायक अनुदान जारी केले गेले नाही. पर्यायाने शिक्षक व निवृत्तांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाच्या आदेशानुसार १ ते ५ तारखेपर्यंत कर्मचाºयांचा पगार होणे बंधनकारक आहे. परंतु यवतमाळ नगरपरिषदेमध्ये शिक्षक व निवृत्तांच्या वेतनासाठी चक्क महिन्याचा शेवट उजाळत असल्याच्याही तक्रारी आहे.