Yavatmal : दोन चिमुकल्यांना विष पाजून मातेने स्वतःलाही संपवले, तिघांचाही करुण अंत
By अविनाश साबापुरे | Updated: August 14, 2023 23:10 IST2023-08-14T23:09:54+5:302023-08-14T23:10:21+5:30
Yavatmal : मातेने आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे घडली.

Yavatmal : दोन चिमुकल्यांना विष पाजून मातेने स्वतःलाही संपवले, तिघांचाही करुण अंत
- अविनाश साबापुरे
फुलसावंगी (यवतमाळ) : मातेने आपल्या दोन चिमुकल्यांना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे घडली. रेश्मा नितीन मुडे असे यातील मातेचे तर श्रवणी (६) व सार्थक मुडे (४) अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत.
निंगनूर गावात मुडे कुटुंब राहते. यातील रेश्मा नितीन मुडे या २८ वर्षीय मातेने सायंकाळच्या सुमारास आपल्या दोन्ही लेकरांना विष पाजले. त्यानंतर स्वत: ही विष घेतले. ही गंभीर बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच धावपळ उडाली. शेजाऱ्यांनी तातडीने या तिन्ही मायलेकरांना फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिन्ही मायलेकरांचा एकापाठोपाठ काही वेळाच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेने निंगनूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमागील नेमके कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन खरात व चमू करीत आहेत.