यवतमाळमध्ये स्कूलबसला अपघात, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By Admin | Updated: February 18, 2016 12:23 IST2016-02-18T10:46:59+5:302016-02-18T12:23:58+5:30

वतमाळ जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी स्कूलव्हॅनला भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या स्कूलव्हॅनला वडगाव फाटा वणी येथे ट्रकने धडक दिली.

Yavatmal killed schoolboy, 4 students die | यवतमाळमध्ये स्कूलबसला अपघात, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

यवतमाळमध्ये स्कूलबसला अपघात, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १८ - यवतमाळ जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी स्कूलव्हॅनला भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या स्कूलव्हॅनला वडगाव फाटा वणी येथे ट्रकने धडक दिली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 
 
या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून, ड्रायव्हरसह सहा जण जखमी झाले आहेत. दोघां मुलांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुलांना रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला.  श्रद्धा हलके, कुमार देवुलकर या मुलांचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका ढोके, निशांत देवुलकर, प्रदीप हलके, हर्शल इंगोले या चार विद्यार्थ्यांना लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: Yavatmal killed schoolboy, 4 students die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.