यवतमाळच्या अजिंक्यने केले सर्वांना मंत्रमुग्ध
By Admin | Updated: April 21, 2016 02:53 IST2016-04-21T02:53:33+5:302016-04-21T02:53:33+5:30
जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहेमान यांच्या तालमीत घडलेल्या यवतमाळातील उदयोन्मुख संगीतकार अजिंक्य सोनटक्केने ....

यवतमाळच्या अजिंक्यने केले सर्वांना मंत्रमुग्ध
यवतमाळ : जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहेमान यांच्या तालमीत घडलेल्या यवतमाळातील उदयोन्मुख संगीतकार अजिंक्य सोनटक्केने मुंबईच्या कलावंतांसोबत गिटावर सादर केलेला परफॉर्म सर्वांना मंत्रमुग्ध करून गेला.
यवतमाळच्या समता मैदानावर आयोजित या कार्यक्रमात अजिंक्यने संगीतबद्ध केलेले ‘जब मानो तु मुख से बोल’ हे आगळ्यावेगळ्या शैलीत स्वरबद्ध केलेले गीत गायिले तेव्हा प्रेक्षक अगदी भारावून गेले. संगीतक्षेत्रात वैदर्भीय मातीतून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या संगीतकार बाबा-किशोर यांच्या नटराज कला अकादमीचे प्रमुख डॉ.किशोर सोनटक्के यांचा अजिंक्य हा मुलगा होय. त्याने जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहेमानच्या तालमीत पियानो, म्युझिक कंपोझिंग, साऊंड इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. यवतमाळात सादर केलेल्या गिटारवरील परफॉर्मने मुंबईचे कलावंतही भारावून गेले होते. अजिंक्य सध्या मुंबईत बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड स्कोअरचे काम करीत आहे. (नगर प्रतिनिधी)