क्षेत्रीय खो-खो स्पर्धेत यवतमाळ संघाला सुवर्ण
By Admin | Updated: August 22, 2015 02:39 IST2015-08-22T02:39:08+5:302015-08-22T02:39:08+5:30
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयातील ....

क्षेत्रीय खो-खो स्पर्धेत यवतमाळ संघाला सुवर्ण
तीन राज्यांचा सहभाग : केंद्रीय विद्यालयाने मारली बाजी, चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर झेप
यवतमाळ : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयातील १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने केंद्रीय विद्यालय मध्यप्रदेश संघाचा पराभव करून प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
१७ ते १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील ५४ केंद्रीय विद्यालयातील खेळाडुंनी सहभाग घेतला होता. यवतमाळच्या संघाने नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व केले. १४ वर्षा आतील खो-खो स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवित थेट अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत यजमान मध्यप्रदेशच्या पन्ना संघाचा एकतर्फी पराभव केला.
विजयी संघात साहिल शंभरकर (कर्णधार), अर्थव भाटी, सुहास घोडाम, मयुर गजभिये, मंदार ढाले, तेजल कुमरे, हर्षीद सिडाम, प्रथमेश गावंडे, देवांशु भुरे, तेजस पेटे, राज पांढरकर, चिराग वानखडे या खेळाडुंचा समावेश होता. संघासोबत मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक अशोक गुल्हाने व व्यवस्थापक म्हणून शैलेंद्र पचघारे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या साहिल शंभरकर, देवांशु भुरे, तेजस पेटे व सुहास घोडाम या खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हे खेळाडु ३१ आॅक्टोबरपासून दिल्ली येथे आयोजित स्पर्धेत सहभागी होतील. केंद्रीय विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह व प्राचार्य पी.व्ही.एस.एस.एस. कृष्णा यांनी विजयी संघाचे कौतुक केले.
(क्रीडा प्रतिनिधी)