‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश
By Admin | Updated: February 29, 2016 02:01 IST2016-02-29T02:01:26+5:302016-02-29T02:01:26+5:30
यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स आॅलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स आॅलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सायन्स आॅलिम्पियाड फाऊंडेशन नवी दिल्लीतर्फे राष्ट्रीय पातळीवर व्दितीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये पार्थ देशमुख, अंतरा खाकसे, आर्यन वाधवानी, अरमान शिंदे, अमोघ कहाळेकर, कौस्तुभ पाटील, सुर्यांश शिरभाते, वेदांग मदने, अमेय काशेट्टीवार, धु्रव अंबाडेकर, मांगल्य राठोड, अंशुल मागेवाडे, श्रृती भेंडारकर, प्रथम भूत, तन्वी कुडे, पार्थ किनकर, ऋतुजा बाहेती, पूर्वा वाघमोडे, सार्थक बारी, कार्तिक पाटेकर, चेतन बावणे, अदनान खान, गौरी पांडे, तनीष लाड, वेदांत देशपांडे, आयुष काकानी, चैतन्य चावक यांनी यश प्राप्त केले.
या शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. १० वीचा विद्यार्थी वेदांत देशपांडे यांनी गुणवत्ता यादीत २४ वे स्थान मिळविले. २७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. आठ विद्यार्थी सूवर्ण पदकाचे तर ९ विद्यार्थी रौप्य आणि कास्य पदकाचे मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांना समन्वयक अर्चना कढव, संगीता ठाकरे, शिक्षक अजय सातपुते, साक्षी नागवानी, निलम शर्मा, विद्या राजगिरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक
केले. (वार्ताहर)