भंगार विकता विकता शोधला नाण्यांचा खजिना अन् ज्ञान मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:04+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या संविधान चौकात ज्ञानाची जत्राच भरली होती. अमूल्य पुस्तकांचे स्टॉल्स गर्दी खेचत होते. तर त्याच गर्दीत रस्त्यावर सतरंजी अंथरून रामभाऊ खोब्रागडे जुन्या नाण्यांचा संग्रह मांडून बसलेले. कत्तू, खडकू, छदाम... अशा किमतीचे नाणे असते हे आजच्या पिढीने ऐकलेही नसेल. गोल नाण्याला मध्येच ‘छिद्र’ असा पैसा कदाचित लहानपणी कोणी खेळणे म्हणून वापरले असेल.

Wreckers find coins for sale and treasure trove of knowledge | भंगार विकता विकता शोधला नाण्यांचा खजिना अन् ज्ञान मार्ग

भंगार विकता विकता शोधला नाण्यांचा खजिना अन् ज्ञान मार्ग

Next
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा : छदाम... कत्तू... खडकू ...अन् गोल नाणे !, एका पैशाचे होतात हजार रुपये

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘प्रॉब्लेम आॅफ रूपी’ हा ग्रंथ लिहून जगाचे डोळे दीपविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा काय असते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, यवतमाळचे रामभाऊ खोब्रागडे. ज्या नाण्यांना आज कवडीचीही किंमत नाही, त्यातूनच त्यांनी हजारोंच्या कमाईचा व्यवसाय उभा केला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या उत्सवात हा ‘हिरा’ अनुयायांचे लक्ष वेधून गेला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी यवतमाळच्या संविधान चौकात ज्ञानाची जत्राच भरली होती. अमूल्य पुस्तकांचे स्टॉल्स गर्दी खेचत होते. तर त्याच गर्दीत रस्त्यावर सतरंजी अंथरून रामभाऊ खोब्रागडे जुन्या नाण्यांचा संग्रह मांडून बसलेले. कत्तू, खडकू, छदाम... अशा किमतीचे नाणे असते हे आजच्या पिढीने ऐकलेही नसेल. गोल नाण्याला मध्येच ‘छिद्र’ असा पैसा कदाचित लहानपणी कोणी खेळणे म्हणून वापरले असेल. पण ती कालबाह्य झालेली नाणी रामभाऊंनी सर्वांसाठी खुली केली होती. एकेकाळी याच खडकूमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळायच्या. आज चलनाबाहेर गेलेली ही नाणी लोकांच्या मनातून काही गेलेली नाही, याचा प्रत्यय रामभाऊंच्या संग्रहाजवळील गर्दीने आला.
हे दुकान आहे की संग्रहालय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण त्याचा उलगडा रामभाऊंनीच केला. ते म्हणाले, रोजगार शोधता शोधता मला हा मार्ग सापडला. यात शौकही पूर्ण झाला आणि मजुरीही झाली. आज सकाळपासून अडीच हजारांचा धंदा झाला.
रामभाऊंची कहाणी काही औरच आहे. त्यांनी सुरवातीला भंगारचा धंदा सुरू केला. एकदा १९७३-७४ च्या सुमारास ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला गेले. तेव्हा तेथे जुणी नाणी त्यांच्या पाहण्यात आली. लोक ती खरेदी करीत होते. रामभाऊंच्याही मनात लगेच विचार चमकला, आपणही अशी नाणी विकली तर! त्यांनी मुंबई पालथी घालून अशा नाण्यांचा शोध घेतला. संग्रह जमविला.
अन् पुढच्याच वर्षी यवतमाळातील महापरिनिर्वाण दिनाच्या उत्सवात स्टॉल लावला. जबरदस्त प्रतिसाद लाभला. तेव्हापासून त्यांचा हा नित्यक्रम सुरूच आहे. आता केवळ मुंबईच नव्हेतर, यवतमाळातीलही अनेकांच्या संपर्कात राहून ते जुण्या नाण्यांचा संग्रह अविरत करीत असतात. किरकोळ किमतीत मिळालेली ही नाणी ते घसघशीत किमतीला विकतात. त्यांच्याकडे मोगल काळापासून तर ब्रिटिश काळापर्यंतची नाणी आहेत. विविध देशातील चलनी नोटाही आहेत.
ही नाणी विकणारे रामभाऊ आणि विकत घेणारे छंदिष्ट हे दोघेही एकप्रकारे ज्ञानाचीच देवाण-घेवाण करीत आहेत.
 

Web Title: Wreckers find coins for sale and treasure trove of knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.