अरे व्वा!! यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा एकही बळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:02 IST2021-06-03T11:00:59+5:302021-06-03T11:02:30+5:30
Yawatmal News चार महिन्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच या मृत्यूमालिकेला ‘ब्रेक’ लागला. २ जून रोजी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. तर केवळ १०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.

अरे व्वा!! यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा एकही बळी नाही
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेतील पहिलाच दिलासाबुधवारी केवळ १०१ पाॅझिटिव्ह, २६७ कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट दरदिवशी बळी घेत आहे. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात एकही दिवस मृत्यूशिवाय उगवला नाही. मात्र चार महिन्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच या मृत्यूमालिकेला ‘ब्रेक’ लागला. २ जून रोजी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. तर केवळ १०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आणि तब्बल २६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण ४८९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४७९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.