बुद्धांच्या विचारांची आज जगाला सर्वाधिक गरज
By Admin | Updated: May 4, 2015 00:09 IST2015-05-04T00:09:10+5:302015-05-04T00:09:10+5:30
जगात सध्या सर्वत्र अराजकता व हिंसा पसरली आहे. अशावेळी आज सर्वाधिक गौतम बुद्धांच्या विचाराची जगाला गरज

बुद्धांच्या विचारांची आज जगाला सर्वाधिक गरज
हंसराज अहीर : आर्णी येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन
आर्णी : जगात सध्या सर्वत्र अराजकता व हिंसा पसरली आहे. अशावेळी आज सर्वाधिक गौतम बुद्धांच्या विचाराची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
आर्णी येथे बुद्धी विहार उद्घाटन सोहळा तथा मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते रविवारी बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार ख्वाजा बेग, उद्धवराव येरमे, भारत राठोड, पुरुषोत्तम गावडे, डॉ.सुनील भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात पैनगंगा पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असे सांगितले. कार्यक्रमासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)