जगाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज
By Admin | Updated: October 19, 2016 00:21 IST2016-10-19T00:21:50+5:302016-10-19T00:21:50+5:30
जगातील तथागत गौतम बुद्ध एकमेव असे राजे आहे की, त्यांनी हाती शस्त्र न उचलता जगावर अधिराज्य गाजविले.

जगाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज
तुषार सूर्यवंशी : भीमशक्ती संघटनेच्यावतीने बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम
पुसद : जगातील तथागत गौतम बुद्ध एकमेव असे राजे आहे की, त्यांनी हाती शस्त्र न उचलता जगावर अधिराज्य गाजविले. जगातील दु:ख पाहून आपल्या राज सिंहासनाचा त्याग केला. आज जगाला आतकंवादातून बाहेर काढण्यासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन भीमशाहीर तुषार सूर्यवंशी यांनी येथे केले.
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी सभागृहात रविवारी आयोजित बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या बहारदार गीतातून त्यांनी समाज प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोहरराव नाईक, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश भगत, मुख्याध्यापक अनिल जोशी, संजय धांडे, डॉ. मनीष पाठक, सुदाम कांबळे, संजय इंगोले, रहेमान चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात तुषार सूर्यवंशी यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून प्रबोधन केले. आपल्या बहारदार आवाजाने उपस्थित श्रोत्यांना तुषार सूर्यवंशी यांनी मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाला आयोजक भीमशक्ती संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष सुरज हाडसे, शहर अध्यक्ष संतोष आंभोरे, पांडुरंग एडके, सुखदेव गायकवाड, बंडू कांबळे, अशोक दीक्षित, रमेश गायकवाड, आनंद धबाले, नारायण हाटकर, सचिन लोणे उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष आंभोरे यांनी संचालन प्रा. जनार्दन गजभिये यांनी तर आभार सुरज हाडसे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)