शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मोडक्या घरकुलात शाळेचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:04 IST

घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून मिळेना इमारत : सीईओ, एसडीओपर्यंत पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. पाच वर्गांची शाळा दोन खोल्यांच्या घरकुलात भरतेय अन् घरकुल मिळालेला गरीब घरासाठी धडपडतोय.एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा डांगोरा पिटणारा शिक्षण विभाग दुसरीकडे शाळेला साधी इमारत देण्यात ही अपयशी ठरत आहे. जिल्हा परिषदेपासून अवघ्या तीन-चार किलोमीटरवरील गोधनीलगतच्या श्रमिकनगरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. पण या शाळेला इमारत नाही. २०१३ पासून येथील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती जागेची मागणी करीत आहे. तरीही दाद मिळत नाही. विशेष म्हणजे, सर्वशिक्षा अभियानातून शाळा बांधकामासाठी निधीही मंजूर झालेला आहे. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सीईओ, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली. मात्र सर्वेनंबर ३०/१ मधील ५ हजार चौरसफुटाच्या या जागेचा प्रस्ताव केवळ सीईओंकडून एसडीओंकडे, एसडीओंकडून तहसीलदारांकडे आणि तहसीलदारांकडून भूमि अभिलेख उपअधीक्षकांकडे फिरत आहे.जागेची मागणी केली, त्यावेळी या शाळेत २५ मुले होती. आता १९ विद्यार्थी आहेत. विलास दुधे नामक गावकऱ्याला मिळालेल्या घरकुलात ही शाळा भरविली जात आहे. परंतु, घरकुलाचे भाडेही वेळेत दिले जात नाही. आता घरकुल मालकही घर रिकामे करून मागत आहे. त्यामुळे शाळा कुठे भरणार, हा प्रश्न चिमुकल्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पहिली ते पाचवी असे वर्ग असून येथे केवळ एकच शिक्षक आहे. त्यामुळे श्रमिकनगरातील मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा