‘सायबर सेफ वुमेन’वर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:11+5:30

सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे.

Workshop on 'Cyber Safe Women' | ‘सायबर सेफ वुमेन’वर कार्यशाळा

‘सायबर सेफ वुमेन’वर कार्यशाळा

ठळक मुद्देएसपींचे मार्गदर्शन : सोशल मीडिया वापरताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाने संयुक्तरित्या ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवक-युवतींमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे. या माध्यमातून प्रत्येकजण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. हा आपला अधिकार असला तरी एखाद्या पोस्टमुळे समाज स्वास्थ्याला धोका निर्माण होतो. या जबाबदारीचे भान ठेऊनच सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.
येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, अनिल किनगे, मार्गदर्शक रम्या कन्नन, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने आदी उपस्थित होते. सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे. यावरून नागरिकांच्या आवडीनिवडी, चेहऱ्यावरचे हावभाव कंपन्यांच्या लक्षात येतात. याचाच फायदा घेऊन मार्केटिंग केले जाते. समाजकंटक अशा माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे.
यावेळी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सायली देवस्थळे, रेखा गुरव, प्रिया उमरे, स्वाती राठोड आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुतांश जणांना सोशल मीडियाचे व्यसन
यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, १५ वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व्हायचे. आज तंत्रज्ञानाचे विशेष करून सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आपली मानसिकता मोबाईलसोबत जुळली आहे.

Web Title: Workshop on 'Cyber Safe Women'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.