महागावमध्ये इच्छुकांची तिकिटासाठी कसरत
By Admin | Updated: January 18, 2017 00:14 IST2017-01-18T00:14:56+5:302017-01-18T00:14:56+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपले भाग्य आजमाविण्यासाठी सज्ज असून तिकिटांसाठी विविध पक्षांकडे याचना करताना दिसत आहे.

महागावमध्ये इच्छुकांची तिकिटासाठी कसरत
जिल्हा परिषद : विविध पक्षांकडे याचना
मोहदी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपले भाग्य आजमाविण्यासाठी सज्ज असून तिकिटांसाठी विविध पक्षांकडे याचना करताना दिसत आहे. कोणतेही इलेक्टीव्ह नसताना उमेदवारीसाठी मात्र धडपड सुरू आहे.
महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे. ‘एक अनार और सौ बिमार’ अशी तिकिटांसाठी अवस्था झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या पक्षांकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय पक्षातील गट-तट उफाळून आले आहे. आपल्या ‘गॉड फादर’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. काहींनी दोन-दोन पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे.
काही पक्षातील गटा-तटांचाही परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो. अनेक अपक्ष रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो. अशा उमेदवारांना घरी बसविणे महत्त्वाचे आहे, तर काही पक्षात विरोधी गट कोणाला उमेदवारी देते त्यानंतर गणित आखण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत महागाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून तिकीट इच्छुकांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)