दारव्हा आगारात कामगारांचा गौरव

By Admin | Updated: September 4, 2016 00:50 IST2016-09-04T00:50:56+5:302016-09-04T00:50:56+5:30

एसटी महामंडळाच्या येथील आगारात कामगारांचा गौरव करण्यात आला. मधुकर गावंडे यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल कामगारांतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Workers' honor in Darwha Agra | दारव्हा आगारात कामगारांचा गौरव

दारव्हा आगारात कामगारांचा गौरव

दारव्हा : एसटी महामंडळाच्या येथील आगारात कामगारांचा गौरव करण्यात आला. मधुकर गावंडे यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल कामगारांतर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक हेमंत चांदुरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवनकर, अध्यक्ष राहुल धार्मिक आदी उपस्थित होते.
यावेळी मधुकर गावंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नीस साडीचोळी भेट देण्यात आली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कामगार संघटनेचे प्रकाश देशकरी, रामजी राठोड, अंबादास धामोरे, अरुण काळे, महिला संघटक रंजूषा किरणापुरे, प्रमिला गेडाम, दत्ता खारोड, भीमराव राठोड, रमेश खाडे, पंडित चव्हाण, फिरोज अली, केशव आसोडे, संजय इंगोले, संतोष खडसे, अविनाश दानी, प्रवीण राऊत, सुरेश वानखेडे, अनुराधा शेलोकार, जया नागरीकर आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workers' honor in Darwha Agra