जिल्हा कचेरीवर धडकले कामगार
By Admin | Updated: December 6, 2014 02:06 IST2014-12-06T02:06:34+5:302014-12-06T02:06:34+5:30
आयटकसह ११ केंद्रीय कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने कामगार विरोधी धोरणाचा आज निषेध नोंदविला. यावेळी शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

जिल्हा कचेरीवर धडकले कामगार
यवतमाळ : आयटकसह ११ केंद्रीय कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने कामगार विरोधी धोरणाचा आज निषेध नोंदविला. यावेळी शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
स्थानिक बसस्थानक चौकातुन निघालेला हा मोर्चा विविध मार्गाने मार्र्गक्रमण करीत जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी विविध मागण्याच्या घोषणा फलकांनी यवतमाळकरांचे लक्ष वेधुन घेतले. विविध मागण्याच्या पूर्ततेचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. यामध्ये वाढत्या महागाईला नियंत्रीत ठेवण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात याव्या. यासोेबतच बेरोजगारांसाठी रोजगार निर्मीती करण्यात यावी. एनआरएचएम आशा कामगार, आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोशन आहार कामगार, विविध क्षेत्रातील संघटीत कामगारांना १५ हजार वेतन देण्यात यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करण्यात यावे. एनआरएचएम मधिल कर्मचाऱ्यांना कायम सवेत घेण्यात यावे. अंगणवाडीचे खाजगीकरण बंद करण्यात यावे. सर्व कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. ६० वर्षावरील जेष्ठांना १० हजार रूपये मानधन देण्यात यावे. यासह विविध मागण्याचा यामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी आयटकसह इतर संघटनांचा आपापल्या स्तरावर लढा सुरू आहे. परंतु याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. राज्यात व केंद्रात आता सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आतातरी या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी आहे.
यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉमरेट पी.पी. घाडगे, जिल्हा सचिव कॉमरेट दिवाकर नागपुरे, संजय भालेराव, विजय ठाकरे, उषा डंबारे, दिलीप उटाणे, कुसुम ताकसांडे, विद्या मुनेश्वर, ज्योती रत्नपारखी, ममता भालेराव, नारायण बोरकर, संगीत बांगडे, नानासाहेब उईके यांच्यासह अनेकजन यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)