शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

उमरखेड तालुक्यात श्रमदानाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:55 PM

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी ३० गावांचे प्रयत्न : एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया ! 

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेत या  गावांनी नवनिर्माणाचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने या गावांनी ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जलव्यवस्थापन करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला गावागावांतील जलदुतांनी स्पर्धेसंबंधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करीत गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे, अनेक गावातील मोजके लोक शेती तर इतर सर्व रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात आबालवृद्धांसह सर्व गाव जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने उतरत आहे.या गावात सीसीटी, एलबीएस, कंटूर बांध, ग्रेडेड कंटूर बांध यासह इतरही कामे उत्कृष्ट व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केले आहे. त्यामुळे बहुतांश गावे महाराष्ट्रात गुणतालिकेत अव्वल  ठरली आहेत.गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रोत्साहनगावे पाणीदार व्हावी यासाठी   सहाय्यक गटविकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी सचिन खुडे हे पुढे सरसावले आहेत. बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात ते घालवित आहेत.अनेक गावांमध्य त्यांनी सहपरिवार श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले.विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने मोठ्यांना प्रेरणातालुक्यातील करंजी या गावात शाळकरी विद्यार्थ्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. त्यांच्यापासून लोकांनाही आपसूकच प्रेरणा मिळते. गावातील लहान मुले जर  दुष्काळाशी दोन हात करण्यात सहभाग घेत असतील, तर आपण का नाही, अशी भावनाही अनेकांच्या मनात जागृत झाली आहे. यामुळे उपक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी झाले आहेत.   उमरखेड तालुक्यातील ३० गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने सहभाग घेतला आहे. यामध्ये तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, महसूल तसेच अनेक सामाजिक संस्थांनीही सक्रीय सहभाग नोंदवला आहे.- जयश्री वाघमारे,गटविकास अधिकारी, उमरखेड

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा