महिला वकिलात फ्री-स्टाईल

By Admin | Updated: December 19, 2015 02:24 IST2015-12-19T02:24:45+5:302015-12-19T02:24:45+5:30

पक्षकारांचे तंटे-बखोटे न्याय मंदिरात सोडविणाऱ्या दोन महिला वकिलांमध्ये न्यायालयाच्या बाजूला असलेल्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी दुपारी चांगलीच फ्री-स्टाईल झाली.

Women's Vocuit Free-Style | महिला वकिलात फ्री-स्टाईल

महिला वकिलात फ्री-स्टाईल


उमरखेड : पक्षकारांचे तंटे-बखोटे न्याय मंदिरात सोडविणाऱ्या दोन महिला वकिलांमध्ये न्यायालयाच्या बाजूला असलेल्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी दुपारी चांगलीच फ्री-स्टाईल झाली. ही फ्री-स्टाईल पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
न्यायालयाचे शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. बाररूममध्ये वकील मंडळी आपआपल्या प्रकरणात गर्क होती. साधारणत: १२.३० च्या दरम्यान दोन महिला वकील एकमेकींचा शिवराळ भाषेत उद्धार करीत न्यायालय परिसरातून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्या. काय घडले कळायच्या आत दोघींमध्ये चांगलीच फ्री-स्टाईल जुंपली. एकमेकींना मारीत ओढाताण सुरू झाली.
अचानक काय झाले म्हणून बघ्यांची मोठी गर्दी झाली. बाररूममधील वकिलांनी तेथे धाव घेतली. या दोघींची समजूत काढून प्रकरण मिटविले. या दोन महिला वकिलांच्या भांडणाचे मूळ कारण मात्र समजू शकले नाही. दोन महिला वकिलांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईलची शहरात मात्र चांगलीच चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's Vocuit Free-Style