दारव्ह्यात महिला होमगार्डचा खून

By Admin | Updated: April 23, 2017 02:27 IST2017-04-23T02:27:55+5:302017-04-23T02:27:55+5:30

धारदार शस्त्राचे घाव घालून महिला होमगार्डची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे उघडकीस आली.

Women's Homeguard murders in Darwah | दारव्ह्यात महिला होमगार्डचा खून

दारव्ह्यात महिला होमगार्डचा खून

शिक्षक कॉलनी : तक्रारीत संशयिताचा उल्लेख, पोलिसांकडून शोध
दारव्हा : धारदार शस्त्राचे घाव घालून महिला होमगार्डची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे उघडकीस आली. वर्षा सुरेश तिरमारे (४१) रा.आदित्यनगर, शिक्षक कॉलनी, असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
विधवा असलेली वर्षा तिरमारे हिला दोन मुले आहेत. ते वेगळे राहतात. दिग्रस बायपासवरील परिसरात वर्षा ही एकटीच वास्तव्याला होती. शुक्रवारी मुलगा प्रतीक सुरेश तिरमारे हा आईकडे गेला होता. तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोळ्यावर, डोक्यावर जखमा आढळल्या, तर गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळले. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने गुरुवारी ही घटना घडली असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रतीक तिरमारे याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मुलाने तक्रारीत एका व्यक्तीवर खुनाचा संशय व्यक्त केला. शिवाय संशयिताचे नावही फिर्यादीत नोंदविले. यावरून संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावंडे, दीपक काँक्रिटवार, जमादार रामराव मुजमुले, कैलास लोथे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Women's Homeguard murders in Darwah