सभापतिपदांवर महिलांचे वर्चस्व
By Admin | Updated: December 18, 2015 02:50 IST2015-12-18T02:50:07+5:302015-12-18T02:50:07+5:30
नगरपालिकेच्या सभापतिपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

सभापतिपदांवर महिलांचे वर्चस्व
यवतमाळ नगरपरिषद : बिनविरोध निवड
यवतमाळ : नगरपालिकेच्या सभापतिपदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यात चार महिलांची सभापतिपदी वर्णी लागली. तर स्थायी समितीमध्ये तीन स्वीकृत सदस्यांना स्थान देण्यात आले.
यवतमाळ नगरपरिषदेच्या सभागृहात दुपारी सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापतिपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. यामुळे ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी ज्योती खोब्रागडे, आरोग्य सभापतिपदी मंदा डेरे, बांधकाम सभापतिपदी रेखा कोटेकर, शिक्षण सभापतिपदी साधना काळे तर नियोजन समितीच्या सभापतिपदी शैलशसिंह अरूणसिंह दालवाला यांची निवड झाली.
स्थायी समितीच्या सदस्यपदी तीन सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये जाफर सादीक गिलानी, प्रवीण प्रजापती आणि सुमित बाजोरिया यांचा समावेश आहे. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनिष दुबे आणि नगरसेवक उपस्थित होते. प्रक्रिया एसडीओ विकास माने आणि परिविक्षाधीन अधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत पार पडली. (शहर वार्ताहर)