नांझाच्या महिला वितरणवर धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:10 IST2017-09-15T00:10:13+5:302017-09-15T00:10:29+5:30
तालुक्यातील नांझा येथे गेल्या काही दिवसांपासून तब्बल आठ ते दहा तास वीज भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल आहेत.

नांझाच्या महिला वितरणवर धडकल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील नांझा येथे गेल्या काही दिवसांपासून तब्बल आठ ते दहा तास वीज भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल आहेत. गावातील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. अखेरीस गुरुवारी येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कार्यालयावर धडक दिली.
सकाळी ६ पासून दुपारी २ पर्यंत साधारणत: नांझा गावातील वीज पुरवठा खंडित असतो. त्यानंतरही २४ तासात पुन्हा तीन-चारवेळा विजेचा लपंडाव सुरूच असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याचा फटका घरगुती पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शेतीचे तर याहीपेक्षा वाईट हाल आहेत. अनेकांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे ते पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. गावातील पीठगिरणीसह इतर लघुउद्योगही बंद राहतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासही अशा स्थितीत होत नाही. अखेरीस आज गावातील महिला-पुरुषांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन भारनियमन कमी करण्याची आग्रही मागणी केली.