विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:31 IST2018-12-11T21:31:40+5:302018-12-11T21:31:49+5:30
मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली.

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या
यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगी वाचली आहे.
मारेगाव तालुक्यातील अकरा किमी अंतरावर असलेल्या सगणापूर येथील रूपा विनोद जुनगरी (वय 31), मुलगा लक्ष्य (वय ६ वर्ष), मुलगी आरोही (वय ३वर्ष ) असे या तिघांचे नाव आहे. या घटनेत महिला व सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी या घटनेतून वाचली आहे. शेतात काम करत असलेले अजाबराव आत्राम यांना माहिती होताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेऊन विहरीतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत महिला व मुलाचा मृत्यू झाला होता. परंतू मुलगी वाचली.
घटनेची फिर्याद मृतक महिलेचे भासरे मंगेश जुनगरी यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिली असून आत्महत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने सगणापुर गावावर शोककळा पसरली. मारेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.