पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी महिलांची वन कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:42 IST2021-08-15T04:42:20+5:302021-08-15T04:42:20+5:30
माकडे वनविभागाच्या यंत्रणेच्या नाकीनऊ आणत आहे. दोन महिन्यात ३० पेक्षा अधिक नागरिकांना माकडांनी चावा घेतला. प्रभाग ९ मधील एका ...

पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी महिलांची वन कार्यालयावर धडक
माकडे वनविभागाच्या यंत्रणेच्या नाकीनऊ आणत आहे. दोन महिन्यात ३० पेक्षा अधिक नागरिकांना माकडांनी चावा घेतला. प्रभाग ९ मधील एका मुलास शुक्रवारी माकडाने गंभीर जखमी केले. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी घेऊन महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष माला देशमुख यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी १० वाजता वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक दिली.
महिलांनी आरएफओ हेमंत उबाळे यांना गराडा घालून आपबिती कथन केली. संजीवनी नरवाडे, लक्ष्मी गाडे, सविता गावंडे, सुशीला गाडे, शोभा गाडे, आबेदा बी शेख रऊफ, गोकर्णा शिंदे, नजराना बी शेख रशीद, छाया शिंदे, परवीन बी शेख इमदाद व अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी अवघ्या दोन तासात पुसद येथील प्रशिक्षित चमू बोलावून माकडांना पकडण्याची मोहीम हाती घेतली.
बॉक्स
कुलूप ठोकण्याचा इशारा
माकडांना ट्रॅंक्यूलाईज (बेशुद्ध) करण्यासाठी विशिष्ट बंदुकीद्वारे डार्ट मारला जातो. मात्र माकडे अत्यंत चपळ आणि धूर्त असल्यामुळे ते सहजासहजी सापडत नाहीत. ट्रॅंक्यूलाईज करणारा डार्ट चुकून ते या झाडावरून त्या झाडावर आणि या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारतात. त्यामुळे वन विभागाची चमू घामाघूम झाली आहे. दरम्यान, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी वन विभागाने माकडांचा बंदोबस्त न केल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.