महिला वनपालास पाच हजारांची लाच घेताना अटक
By Admin | Updated: October 8, 2014 23:32 IST2014-10-08T23:32:54+5:302014-10-08T23:32:54+5:30
सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील

महिला वनपालास पाच हजारांची लाच घेताना अटक
पांढरकवडा येथे कारवाई : सागवानाचा पंचनामा अहवालासाठी मागणी
पांढरकवडा : सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील राणीलक्ष्मीबाई वार्डात बुधवारी दुपारी करण्यात आली.
रिना गुलाबराव पाटील असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या महिला वनपालाचे नाव आहे. ती उमरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रादेशिक) येथे कार्यरत आहे. खरेदी केलेल्या सागवानाच्या झाडांचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारकर्त्याला पाच हजारांची मागणी केली. त्यावरून संबंधिताने तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. बुधवारी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारकर्त्याने वनपाल रिना पाटील यांना त्यांच्या राहत्या घरीच पाच हजाराची लाच दिली. पंचाचा इशारा मिळताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच लाचेची रक्कम जप्त केली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख, कर्मचारी अमोल महल्ले, नयन लेवरकर, नीलेश पखाले, अनिल जोशी, शैलेश ढोले, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड आदींनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)