शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

प्रसूतीस आलेल्या महिलेला डॉक्टरांनी मध्यरात्री हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:55 PM

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाºयाच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे.

ठळक मुद्देपोलीस चौकशी सुरू : भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीलाच असभ्य वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे. विशेष म्हणजे या घटनेची पोलिसात तक्रार पोहोचल्यानंतर रुग्णालयीन गैरकारभाराची थेट पोलीस चौकशी सुरू झाली आहे.हा गंभीर प्रकार ६ आॅगस्टच्या रात्री घडला. महागाव भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याने आपल्या प्रसव वेदनेने तडफडणाºया पत्नीला मंगळवारी रात्री १० वाजता मेडिकलच्या प्रसूती वॉर्डात आणले होते. येथे तिसºया मजल्यावर चढताना साधे स्ट्रेचरही उपलब्ध नव्हते. या युवा पदाधिकाऱ्यानेच शोधाशोध करून कशीतरी व्हीलचेअर मिळविली. वॉर्डात पोहोचल्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडून टोलवाटोलवी सुरू होती. तडफणाऱ्या महिलेला येथे कशाला आणले, खासगीत जायचे होते, अशा शब्दात सुनावले. प्रसवकळा सुरू असतानाही एक महिना प्रसूतीला अवकाश असल्याचे सांगितले. रात्री वेदना वाढल्यानंतरही डॉक्टर प्रतिसाद देत नव्हते.अखेर रात्री २ वाजता तडफडणाºया पत्नीला घेऊन त्या भाजपा युवा पदाधिकाºयाने खासगी रुग्णालयात धाव घेतली. सरकारीत प्रसूतीला एक महिना अवकाश असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयात बुधवारी दुपारी प्रसूती झाली. अपमानास्पद वागणूक व जीविताला धोका निर्माण होईल, असे कृत्य सरकारी डॉक्टरांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पोलिसांनी नोटीसही दिली आहे. या घटनेवरुन गरीब महिलांना काय वागणूक मिळत असेल याची कल्पना येते.खुद्द जिल्हा कारागृह अधीक्षकांची तक्रारया प्रकरणात खुद्द जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्तीचिंतामणी यांनी तक्रार दिली आहे. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी तक्रार अर्जाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्याकडे तपास देण्यात आला. मंगळवारी रात्री १० वाजता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांची ओळख पटवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज