लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे एक ड्रम पाण्यात संपूर्ण कुटुंबाला १५ दिवस काढावे लागते. नगरपरिषद व प्रशासनाने तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी काँग्रेस महिला आघाडीच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठिय्या दिला. या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे यांनी केले. जनतेची समस्या घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांचा आवाज पालकमंत्री दडपत आहे. आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात पारस अराठे, नगरसेवक पल्लवी रामटेके, ललित जैन, मनीष बोनकिले, प्रशांत शेटे, सागर सूर्यवंशी, नीलेश बावणकर, शुभम बावणकर, शुभम जयस्वाल, ताराबाई नारायणे, कविता नागपुरे, विजया कास्टकर, दीपा पाटे, वर्षा खत्री, सारिका बोरकर, शीतल नागोसे सहभागी झाल्या होत्या.भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सर्कलमधील डोर्ली गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या एका युवकाने चक्क खासदार निधीतील बोअरवेलवर अतिक्रमण करून पाण्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे येथील महिला संतप्त झाल्या. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. पोलिसांनी त्यांना तिरंगा चौकातच अडविले. या मोर्चाचे नेतृत्व प्रवीण काळे यांनी केले. शेकडो महिला हातात रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा परिषद सीईओंना दूरध्वनी करून अभियंत्यांकडून अहवाल मागण्याचे निर्देश दिले. या आंदोलनात विजया डुमारे, लीलाबाई मेश्राम, मीराबाई काकडे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या दोन आंदोलनाने पाणीटंचाईची तीव्रता अधोरेखित केली.नगराध्यक्षांऐवजी अधीक्षकाला निवेदननगरपरिषदेत काँग्रेस महिला आघाडीने पाण्यासाठी सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्या महिला पालिकेत दाखल झाल्या तेव्हापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगराध्यक्ष कांचन चौधरी आपल्या कक्षात उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याऐवजी पालिकेतील अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले. मुख्याधिकारी अनिल अढागळे हे बेंबळा प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. आंदोलकांनी दुपारी ४ वाजता गुल्हाने यांना निवेदन देऊन आपल्या आंदोलनाची सांगता केली. आपल्या कक्षात नगराध्यक्ष उपस्थित असतानाही आंदोलकांनी पालिकेतील एका कर्मचाऱ्याला निवेदन दिले. या प्रकाराची पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
पाण्यासाठी महिला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:20 IST
शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली.
पाण्यासाठी महिला रस्त्यावर
ठळक मुद्देकाँग्रेसचा नगर परिषदेवर तर डोर्लीवासीयांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा