अपघातात महिला मजूर ठार, २४ जखमी

By Admin | Updated: September 29, 2014 23:12 IST2014-09-29T23:12:17+5:302014-09-29T23:12:17+5:30

मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव वाहन उलटून झालेल्या अपघातात मजूर महिला ठार, तर २४ जण जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

Woman laborers killed, 24 injured in accident | अपघातात महिला मजूर ठार, २४ जखमी

अपघातात महिला मजूर ठार, २४ जखमी

चार गंभीर : कळंब येथील घटना
कळंब : मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव वाहन उलटून झालेल्या अपघातात मजूर महिला ठार, तर २४ जण जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता येथील विद्युत कंपनीच्या कार्यालयाजवळ घडली.
एमएच-२९ टी ६४७६ या चारचाकीने तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) आणि यवतमाळ तालुक्याच्या पारवा येथील महिला मजूर परसोडी (बु.) येथील प्रशांत ढाले यांच्या शेतात कामासाठी जात होते. दरम्यान, राळेगाव रोडवरील विद्युत कंपनीच्या कार्यालयाजवळील वळणावर ही गाडी उलटली. या अपघातात चंद्रभागा शहागडे (६५) रा.पिंपळगाव ही महिला ठार झाली. उमा बिरडकर (४०), निर्मल उमाटे, लता शिंदे, अनिता सरगट यांची प्रकृती गंभीर आहे.
गोकर्णा तुडवे, दीक्षा भागडकर, नंदा वाघाडे (३५), नंदा काळसर्पे, सीता वाघाडे, सिंधू जुनघरे, सीमा साहारे, बेबी शेंदरे, राधा तायडे, तारा राऊत, पार्वता नेहारे, मंदा कळसपुरे (६०), तानाबाई राऊत (६५) सोनू शहागडे (२०) रा.सर्व पिंपळगाव आणि कुसुम वाघमारे, वैशाली वाघमारे, गीता मून, वंदना पाटील, प्रभा वानखडे, शोभा पलंगे, कुसूम भगत रा. सर्व पारवा या जखमी झाल्या. जखमींना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले. याप्रकरणी चालक प्रकाश पंजाब तिखे याच्याविरुध्द कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Woman laborers killed, 24 injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.