मजुरांच्या जत्थ्यात ट्रॅक्टर शिरल्याने महिला ठार
By Admin | Updated: July 1, 2017 00:53 IST2017-07-01T00:53:03+5:302017-07-01T00:53:03+5:30
शेतात जाणाऱ्या मजुरांच्या जत्थ्यात अचानक ट्रॅक्टर शिरून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार,

मजुरांच्या जत्थ्यात ट्रॅक्टर शिरल्याने महिला ठार
गिमोणाची घटना : चार महिला जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : शेतात जाणाऱ्या मजुरांच्या जत्थ्यात अचानक ट्रॅक्टर शिरून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना तालुक्यातील गिमोणा येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
अनिता शांताराम डेहणकर (२८) रा.गिमोणा, असे मृत महिलेचे नाव आहे. वर्षा भास्कर डोंगरे, राणी मंगेश महालगावे, अरुणा ईश्वर ढोणे, पुष्पा संदीप कांबळे (सर्व रा.गिमोणा), अशी जखमींची नावे आहेत. या महिला मजूर शुक्रवारी राणीअमरावती येथे पायी जात होत्या. मागाहून आलेला भरधाव ट्रॅक्टर या मजुरांच्या जत्थ्यात शिरला. काही कळायच्या आत अक्षरश: मजुरांना चिरडले. त्यात अनिता जागीच ठार झाली, तर चार महिला जखमी झाल्या. याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी ट्रॅक्टर चालक दिलीप सिनानाथ चव्हाण (२४) रा.नांदुरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.