विजेचा शॉक लागून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST2021-08-19T04:45:50+5:302021-08-19T04:45:50+5:30

महागाव : तालुक्यातील बोथा शिवारात विजेचा शॉक लागून २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन गायी व एक ...

Woman killed by electric shock | विजेचा शॉक लागून महिला ठार

विजेचा शॉक लागून महिला ठार

महागाव : तालुक्यातील बोथा शिवारात विजेचा शॉक लागून २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन गायी व एक श्वानही दगावला. ही घटना बुधवारी घडली.

सुनीता रामराव मोरे असे मृत महिलेचे नाव आहे. बोथा शिवारात माणिक मोरे यांच्या शेतालगत धनराज रामराव मोरे (१२) हा मुलगा गायी चारत होता. अचानक गाय खाली कोसळली व जोराने हंबरली. जवळच धनराज याची आई सुनीता मोरे काम करीत होत्या. त्यांनी मुलाकडे धाव घेऊन जिवंत विद्युततार बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता विजेच्या प्रवाहामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एका शेतकऱ्याने अनधिकृतपणे एक हजार फुटावरून शेतातील टोमॅटो पिकासाठी असलेली वीजवाहिनी आपल्या गोठ्यावर नेली. त्याच ठिकाणी त्याला अर्थिंग देण्यात आली. याबाबत त्या शेतकऱ्याशिवाय कुणालाही कल्पना नसल्याने हा अनर्थ घडल्याचे सांगितले जाते.

बॉक्स

वीजचोरीमुळे घडला अनर्थ

घटनेची माहिती वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता विनोद चव्हाण यांना कळताच त्यांनी चमू घेऊन घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. वीज चोरी करणाऱ्या त्या शेतकऱ्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती विनोद चव्हाण यांनी दिली.

Web Title: Woman killed by electric shock