उमरखेडमध्ये हिलेने दिला तिळ्यांना जन्म; बाळ अन् बाळंतीण नांदेड जिल्ह्यातील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 08:45 PM2020-10-16T20:45:46+5:302020-10-16T20:46:04+5:30

९ ऑक्टोबरला तिळ्यांना जन्म दिला. त्यात दोन मुले आणि एक मुलगी आहे.

The woman gave birth to sesame seeds; Bal and Balantin from Nanded district | उमरखेडमध्ये हिलेने दिला तिळ्यांना जन्म; बाळ अन् बाळंतीण नांदेड जिल्ह्यातील 

उमरखेडमध्ये हिलेने दिला तिळ्यांना जन्म; बाळ अन् बाळंतीण नांदेड जिल्ह्यातील 

Next

यवतमाळ : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पाथरड येथील एका महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात तिळ्यांना जन्म दिला. बाळ आणि बाळंतीन सुखरूप असून तालुक्यात पहिल्यांदाच तिळ्यांचा जन्म झाला आहे. 

पाथरड ता.हदगाव जि.नांदेड येथील ज्योत्स्रा माधवराव पवार ही महिला प्रसूतीसाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांनी ९ ऑक्टोबरला तिळ्यांना जन्म दिला. त्यात दोन मुले आणि एक मुलगी आहे. नवजात बाळ आणि आई सुखरूप असल्याचे डॉ. प्रीती जयस्वाल यांनी सांगितले. तालुक्यात पहिल्यांदाच एखाद्या महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याचे सांगितले जाते. 

ज्योत्स्ना यांचे पती शेतकरी आहे. या दाम्पत्याला यापूर्वीच तीन मुली आहे. प्रसूतीसाठी त्यांनी उमरखेडला धाव घेतली होती. अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी ज्योत्स्ना पवार यांची सुखरूप प्रसूती केली. त्यामुळे डॉक्टर व सहायकांचे कौतुक होत आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून आता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

Web Title: The woman gave birth to sesame seeds; Bal and Balantin from Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.