गावी पायदळ परतत असलेल्या महिला पुरात वाहून गेली

By विलास गावंडे | Updated: July 11, 2023 14:50 IST2023-07-11T14:48:29+5:302023-07-11T14:50:43+5:30

पंचगव्हाणपासून काही अंतरावर तरंगताना आढळला मृतदेह

Woman dies in flood in Yavatmal district | गावी पायदळ परतत असलेल्या महिला पुरात वाहून गेली

गावी पायदळ परतत असलेल्या महिला पुरात वाहून गेली

बाभूळगाव (यवतमाळ) : नातेवाईकांना भेटून गावी पायदळ परतत असलेल्या महिलेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पंचगव्हाण (ता.बाभूळगाव) येथे घडली. नानीबाई भीमराव देवतळे (५२) रा.चोंढी, ता.बाभूळगाव, असे या महिलेचे नाव आहे.

नानीबाई देवतळे या आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरिता पंचगव्हाण येथे पायदळ गेल्या होत्या. चोंढी ते पंचगव्हाण हे अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. सायंकाळी पंचगव्हाण येथून चाेंढी येथे परतण्यासाठी पायदळ निघाल्या. पंचगव्हाण जवळच असलेल्या पुलावरून पाणी वाहात होते. त्यातून मार्ग काढत असताना त्या वाहून गेल्या. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पंचगव्हाणपासून काही अंतरावर तरंगताना आढळला. नानीबाई यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Woman dies in flood in Yavatmal district