शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वणी, झरीला गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:04 IST

वणी तालुक्यासह झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच तांडव घातले. यादरम्यान, जोरदार गारपीटही झाली. विशेष म्हणजे वणी परिसराला गत दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला चांगलाच फटका बसला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : भाजीपाला, गहू, चणा पिकाला फटका, वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यासह झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच तांडव घातले. यादरम्यान, जोरदार गारपीटही झाली. विशेष म्हणजे वणी परिसराला गत दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला चांगलाच फटका बसला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.गेल्या तीन दिवसांपासून वणी परिसरात दररोज सायंकाळी निसर्गाचे अक्षरश: तांडव सुरू आहे. बुधवार व गुरूवार असे सलग दोन दिवस वादळी पावसाने थैमान घातले. गुरूवारी सायंकाळी सहा वाजतानंतर अचानक आभाळ भरून आले. त्यानंतर वादळ सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात या परिसराला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे वणी तालुक्यातील ५५ हेक्टरवरील गहू, चणा व भाजीपाला पिक उद्ध्वस्त झाले. कृषी विभागातर्फे लवकरच या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. गुरूवारी रात्री वादळी पावसामुळे वणी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरू झाला नव्हता.झरी तालुक्यात मोठे नुकसानझरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट झाली. यात शेतात ठेवून असलेले सोयाबीन व तुरीचे कुटार भिजून खराब झाले. या तालुक्यात वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळामुळे तालुक्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरूस्तीचे काम अद्यापही सुरू आहे. वीज पुरवठा बंद असल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.पाटणबोरीत झाड कोसळून बैलजोडी ठारगुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पाटणबोरी येथील १५० वर्षे जुने चिंचेचे झाड कोसळून त्या झाडाखाली असलेली बैलजोडी जागीच ठार झाली, तर दोन बैल जखमी झाले. नागरिकांनी या जखमी बैलांना बाहेर काढले. तसेच मंगलसिंग बावरे यांच्या घरावर कडूनिंबाचे झाड कोसळल्याने घराची भिंत क्षतीग्रस्त झाली. सुदैवाने जिवीतहानी टळली. तसेच वासवी मंदिराचेही एका भागाचे छत वाकले. पाटणबोरी ते पाटण रस्त्यादरम्यान झाड उन्मळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच विजेचे खांब वाकल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. पिंपरी येथील सुशिला पसलवार यांच्या शेतातील पाच एकरवरील मिर्चीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रमेश तोटावार यांच्या शेतातील मका पिकाचे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस