पत्नीने घेतला गळफास तर पतीने केले विषप्राशन; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:19 PM2019-09-27T12:19:26+5:302019-09-27T22:51:22+5:30

पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

Wife and husband committed suicide; in Yavatmal district | पत्नीने घेतला गळफास तर पतीने केले विषप्राशन; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

पत्नीने घेतला गळफास तर पतीने केले विषप्राशन; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

Next
ठळक मुद्देकारण अद्यापी गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :    पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना येथील पोलीस वसाहतीत क्वॉर्टरमध्ये शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास घडली.
वर्षा शंकर राठोड (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. शंकर सुंदरसिंग राठोड (४८) असे विष प्राशन करणाऱ्या पोलीस वाहन चालकाचे नाव आहे. त्याला पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पुसदच्या एसडीपीओंचे वाहन चालक सुंदरसिंग राठोड पत्नी वर्षा (३०) आणि वंश (६) व विराट (४) या दोन चिमुकल्यांसह शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस वसाहतीतील बिल्डींग क्रमांक ११ मधील क्वॉर्टर नंबर ९ मध्ये राहात होते. शुक्रवारी शंकर सकाळी बाहेर गेले होते. त्यानंतर पत्नी वर्षाने मुलांची तयारी करून त्यांना शाळेत सोडले. परत ८ वाजता घरी आल्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यानंतर शंकर घरी परत आले असता पत्नीने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनीही स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी त्यांना सर्वप्रथम येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर त्यांना नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. हा सर्व थरार केवळ घरगुती कारणातून झाल्याचे समजते. पुसदचे एसडीपीओ अनुराग जैन, शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी, वाहतूक शाखेचे रविंद्रनाथ भंडारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी मनोहर सुंदरसिंग राठोड यांच्या तक्रारीवरून तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Wife and husband committed suicide; in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.