विठू नामाच्या गजराने दुमदुमली पुसद नगरी
By Admin | Updated: July 28, 2015 03:22 IST2015-07-28T03:22:53+5:302015-07-28T03:22:53+5:30
विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीला प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदर्भाची पंढरी पुसद नगरीत १३२ वर्षाची

विठू नामाच्या गजराने दुमदुमली पुसद नगरी
भाविकांची मंदियाळी : १३२ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या प्रतिपंढरपूरमध्ये गर्दी
पुसद : विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीला प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विदर्भाची पंढरी पुसद नगरीत १३२ वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व जिल्ह्याबाहेरील हजारो भाविकांनी भल्या पहाटेपासून गर्दी केली होती.
‘माऊलीचा नाद मन विठ्ठल, तुकोबाची साद अवघे निनादले टाळ’ अशा प्रकारच्या विठ्ठलनामाचा गजर पुसद नगरीत सोमवारी सुरू होता. ज्ञानेश्वर मंदिराने यावर्षीसुद्धा आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी पुरेपूर नियोजन केले होते. आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे ४ वाजता विठ्ठल-रुख्मीनी व ज्ञानेश्वर माऊलीचे अभ्यंगस्नान आणि विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी ६ वाजता महाआरती झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजाराम चिद्दरवार, बिपनी चिद्दरवार, जयंत चिद्दरवार, गादेवार परिवार, डॉ. सतीश चिद्दरवार, अॅड़ अतुल चिद्दरवार, निखील चिद्दरवार, विजय भांगडे, भय्या पद्मावार, डॉ. प्रफुल्ल पद्मावार, डॉ. गादेवार, सुभाष पापीनवार यांच्यासह हजारो सेवाधाऱ्यांनी परिश्रम घेतले.
े(तालुका प्रतिनिधी)