शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात आक्रीत घडले ... मंडप उभारताना विजेच्या शॉकने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

By विलास गावंडे | Updated: September 26, 2023 16:23 IST

आई, वडील, दोन भाऊ व मोठा आप्त परिवार

अकोला बाजार (यवतमाळ) : महालक्ष्मी पुजनाच्या कार्यक्रमासाठी घराच्या छतावर मंडप उभारताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना वडगाव (पो.स्टे.) ता.यवतमाळ येथे घडली. खुशाल पुंडलिक गावंडे (२४) रा. वडगाव, असे मृताचे नाव आहे. विकास अनंता गेडाम (२५) हा जखमी आहे.

वडगाव येथील इंदिरानगर वस्तीत खुशालचे काका नामदेव गावंडे यांच्या घरी महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होता. पावसाची रिपरिप सुरू असल्याने २१ सप्टेंबर रोजी नामदेव गावंडे यांच्या घराच्या स्लॅबवर खुशाल गावंडे व त्याचा मित्र मंडप टाकत होते. घरावरून गेलेल्या विद्युत ताराला अँगलचा स्पर्श झाल्याने खुशालला विजेचा शॉक लागला. खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तत्काळ यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.

खुशाल हा एमएच २९ हेल्पिंग हँडस् टीममध्ये वन्यजीव संरक्षक म्हणून काम करीत होता. सामाजिक कार्यात तो नेहमी अग्रेसर असायचा. खुशालच्या मृत्युमुळे गणपतीचे महाप्रसाद कार्यक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रद्द केले. खुशालला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मित्र विकास गेडाम शॉक लागून किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती बरी झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूYavatmalयवतमाळ