यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथे दारू वाटप करीत असताना उमेदवारास ग्रामस्थांनी रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 14:04 IST2021-01-15T14:04:25+5:302021-01-15T14:04:44+5:30
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील सवना येथे एका उमेदवारास देशी दारू वाटप करीत असताना ग्रामस्थानी रंगेहात पकडले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथे दारू वाटप करीत असताना उमेदवारास ग्रामस्थांनी रंगेहात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तप्त होत आहे. उमेदवारांकडून मतदारांना आकृष्ट करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. त्यानूच गावात देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टी दारूचा महापूर वाहत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील सवना येथे एका उमेदवारास देशी दारू वाटप करीत असताना ग्रामस्थानी रंगेहात पकडले आहे. महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत अडेगाव येथे एका शेतशिवारात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड घालून मतदारांना वाटण्यासाठी ठेवलेली देशी दारू जप्त केली आहे.