ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती
By Admin | Updated: January 6, 2017 02:03 IST2017-01-06T02:03:34+5:302017-01-06T02:03:34+5:30
सावित्री महिला मंचच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन येथील महादेव मंदिरात करण्यात आले होते.

ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती
पुसद : सावित्री महिला मंचच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन येथील महादेव मंदिरात करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अनिताताई नाईक पल्लवी देशमुख, नगरसेविका इंदूताई गवळी उपस्थित होत्या. यावेळी प्रा. अर्चना हरिमकर यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. सावित्री महिला मंचच्या अध्यक्ष स्मीता गिऱ्हे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांचा सत्कार केला. तर पाहुण्यांचा सत्कार राजश्री घाटे, वंदना कदम, भारती राऊत यांनी केला. यावेळी ‘मी सावित्री बोलतेय’ ही लघु नाटीका अपूर्वा जाधव, तन्वी घाटे, दिव्यजा चोपडे यांनी सादर केली. या सोबतच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना रंजना दळवी यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. संचालन महिला मंचच्या सचिव अर्चना गवळी, प्रणाली गवळी यांनी तर आभार वंदना कदम यांनी मानले. यशस्वीतेसाठी संध्या गिऱ्हे, मंगला नाळे, सुनीता कदम, त्रिवेणी सोळंके, वैशाली गवळी यांनी परिश्रम घेतले.
गुणवंतराव देशमुख विद्यालय, पुसद
पुसद : तालुक्यातील कवडीपूर (तांडा) येथील गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. अंजली पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आशा पौळ होत्या. कार्यक्रमात किरण पांढरे, प्रवीण बस्सी, तुषार राठोड, रोशन राठोड, मनोज भोयर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रियंका कांबळे व ऐश्वर्या चंद्रवंशी यांनी तर आभार ऋतुजा पवार यांनी मानले.
पार्वतीबाई नाईक कान्व्हेंट, पुसद
पुसद : येथील मातोश्री पार्वतीबाई नाईक कान्व्हेंटमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एन. खराटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिटा शेख उपस्थित होत्या. संचालन अंजली बोंबले यांनी तर आभार संतोष काळे यांनी मानले.
कला, वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब
बोरी अरब : येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. केशवराव फाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुजाता नाईक होत्या. यावेळी प्राचार्य फाले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. यावेळी विशेष इंग्रजी वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. असरार खान या वर्गाचे नियमित काम पाहणार आहे. संचालन प्रफुल पुनसे यांनी प्रास्ताविक प्रा.डॉ. दीपक कुटे यांनी आभार राम रुंदे यांनी मानले.
फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद
पुसद : येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस.बी. रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद दवणे, प्रा. दिनकर गुल्हाने, प्रा. निता सेता, कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश राठोड उपस्थित होते. रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा. प्रदीप राऊत यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थी भागवत ताळीकुटे, सचिन कांबळे, सुप्रिम चव्हाण, अविनाश जाधव, ऋषभ अलोणे, सुमेध जाधव, सुप्रिया मनवर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. रमेश वाघमारे, प्रा. वैभव पाटील, प्रा. संजय पद्माकर, डॉ. अजय पवार, प्रा. वसंत राठोड, प्रा. विदुला कटकमवार, प्रा. पूनम काळे, प्रा. सय्यश जाधव, प्रा. सतीश राठोड, प्रा. निसर्ग आडे, प्रा. पोळकर, विशाल कांबळे, सुहास खडसे उपस्थित होते.
प्राथमिक शाळा, माळकिन्ही
गुंज : महागाव तालुक्यातील गुंज येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी निशा गोरे होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद पांडव, नीलेश खंदारे, साक्षी लहाणे, वैष्णवी तानकर, पुजा रिंगे, शिक्षक अमोल कत्ते उपस्थित होते. यावेळी सपना रहिमकर, मिनाक्षी लहाणे, वैष्णवी कानडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक प्राण तिवसकर यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. रामराव टेकाडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सुप्रिया मत्ते यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजू अनंतवार, माधव गोदमले, देविदास पाऊलबुद्धे, विलास हाके यांनी परिश्रम घेतले.