शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

माणुसकीपुढे नियम जेव्हा नमतात; यवतमाळचा टमू आईकडे परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:39 AM

तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेशआनंदवनाला मुभा दिली, तशी सवईकरांनाही द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. त्याबाबत ‘लोकमत’ने ‘लाडका टमू आईला मुकला.. पिंजऱ्यात अडकला’ असे वृत्त प्रकाशित करताच समाजमन हळहळले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले. त्यामुळे मायलेकराचा साडेतीन महिन्यांचा विरह संपण्याची चिन्हे आहेत.काय आहे टमूची कहाणी? १२ वर्षांपूर्वी यवतमाळ-आर्णी मार्गाने प्रवास करत असताना यवतमाळच्या  नीलिमा सवईकर यांनी एक अपघात डोळ्यादेखत पाहिला. भरधाव ट्रकखाली एक गर्भवती माकडीण चिरडली. ते पाहून निलिमाताई थांबल्या. माकडीणीच्या पोटातून बाहेर आलेली आतडी हलताना त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर गर्भातून बाहेर पडलेला छोटा जीव त्यांना दिसला. माकडीणीचं ते बाळ निलिमाताईनी लगेच यवतमाळात आणलं. स्वत:च्या घरी त्याची शुश्रूषा सुरू केली. तीन वर्षे डॉ. अलोणे यांच्याकडून उपचार करवून घेतले. बरा होता होता आणि मोठा होता होता हा वानर सवईकर कुटुंबाचाच एक सदस्य बनला. त्याने वानरांची दुनियाच पाहिली नाही. पाहिले ते माणसांचेच कुटुंब.

माणसाळलेला टमू

टमूने माकडांचे जगच पाहिले नाही. तो पूर्णत: माणसाळलेला आहे. सवईकर कुटुंबीयांच्या सहवासाविना तो जेवतही नाही. अशा टमूला मार्च महिन्यात वनविभागाने अचानक हिरावून नेले. काही दिवस यवतमाळात आणि नंतर वर्ध्याच्या प्युपिल्स रेस्क्यू सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. पण नीलिमा सवईकर, त्यांचा मुलगा प्रतिक यांनी ‘टिफिन’ नेल्याशिवाय टमू काहीही खात नाही.वनविभागाने त्याला पिंजऱ्यात ठेवले असून त्याला जंगलात सोडण्याच्या हालचाली आहेत. मात्र, तो माकडांना घाबरतो, जंगलात तो जगूच शकणार नाही, त्याच्या जीवनाची दोन-तीन वर्षे उरली आहेत, ते आयुष्य त्याला आमच्यासोबतच सुखाने जगू द्या, अशी मागणी नीलिमा सवईकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी यवतमाळच्या उपवनसंरक्षकांना सविस्तर लेखी आदेश देऊन टमूला नीलिमा सवईकर यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शासनाने वन्यप्राणी ठेवण्याची मुभा दिली, त्याच धर्तीवर नीलिमा सवईकर यांना न्याय द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. आता या आदेशावर वनविभाग काय भूमिका घेतो, याकडे सवईकर कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री, वनमंत्र्यांनाही पत्रशिवाय, यवतमाळच्याच अरविंद झाडे यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्री, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वर्ध्याचे वनसंरक्षक आदींना पत्र पाठवून टमूला सोडण्याची कळकळीची विनंती केली आहे. ‘लोकमत’ वृत्ताचा हवाला देत त्यांनी हे पत्र पाठविले असून आईसाठी तडफडत टमूचा मृत्यू झाल्यास वनविभागाचा कायदा जिंकेल पण माणुसकी मरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Monkeyमाकड