ट्रॅव्हल्सची चाके थांबली, चालक-मालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:47+5:30
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली आहेत. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती व्यक्ती एका ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता हे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. जिल्ह्यात ३०० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह चालणारे तीन हजारावर कुटुंब आहेत.

ट्रॅव्हल्सची चाके थांबली, चालक-मालक अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या तडाख्यात ट्रॅव्हल्सही सापडली. पाच महिन्यांपासून या वाहनांची चाके रुतली आहे. एक पैशाचेही उत्पन्न या वाहनांपासून मिळाले नाही. उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहे. बॅटऱ्या, टायर खराब झाल्याने दुरुस्तीचा खर्चही डोक्यावर बसला आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक हात रिकामे झाले आहे. टाळेबंदी उठावी, गाडी रस्त्यावर यावी, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स चालक-मालकांना आहे.
२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली आहेत. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती व्यक्ती एका ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता हे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. जिल्ह्यात ३०० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह चालणारे तीन हजारावर कुटुंब आहेत.
विशेष म्हणजे ट्रॅव्हल्सची किंमत ४० ते ५० लाखांच्या घरात आहे. काही लोकांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाचा किमान मासिक हप्ता सव्वा लाख रुपये आहे. अनेक ट्रॅव्हल्स मालकांना कर्जाचा हप्ता परतफेड करता आली नाही. आता वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे.
एका गाडीमागे ६० हजारांचा कर महिन्याकरिता अदा करावा लागतो. सध्या हा कर माफ करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स सुरू झाल्यास नवीन कराचा भरणा करावा लागेल. यासाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. गाडी पाच महिन्यांपासून बंद असल्याने इंजिन, टायर आणि बॅटरी पुन्हा रूळावर आणावी लागणार आहे. त्याकरिता एका ट्रॅव्हल्सला किमान ५० हजारांचा खर्च येणार आहे. ट्रॅव्हल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या व्यावसायिकांची आहे.
ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत आहे. त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. प्रवाशांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्जावरचे व्याज माफ करून दिलासा द्यावा.
- बंटी जयस्वाल, संचालक, चिंतामणी ट्रॅव्हल्स, यवतमाळ