शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार कोटींच्या वीज कंत्राटात नुकसान किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:15 IST

राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापारेषण कंपनीवीज नियामक आयोगालाही अंधारात ठेवले

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. एवढेच काय, वीज नियामक आयोगालाही याची खबरबात लागू दिलेली नाही.वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सदस्य आय.एम. बोहरी आणि मुकेश खुल्लर यांनी १२ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशात ईपीसी कंत्राटामुळे वीज पारेषण कंपनीला किती नुकसान झाले ही बाब स्पष्ट केलेली नाही. ईपीसी कराराचे हे धोरण पूर्णपणे फसले हे सर्वश्रृत आहे. पाच वर्षांपूर्वी अतिउच्चदाब वीज वाहिन्याची उभारणी व उपकेंद्राच्या निर्मितीसाठी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, वाशी, अमरावती, पुणे व कराड परिमंडळांतर्गत ईसीआय, अरेव्हा, कल्पतरू, आयसोलेक्स व ज्योती या पाच कंपन्यांना साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट देण्यात आले होते. त्यापोटी कराराच्या दहा टक्के अर्थात १६० कोटींची रक्कम अ‍ॅडव्हॉन्स म्हणून प्रदान करण्यात आली. मात्र करार फसल्याने हे कंत्राट रद्द करण्यात आले. या कामांचे तुकडे पाडून अनेक छोट्या कंत्राटदारांकडून काही कामे करून घेण्यात आली.१६० कोटींच्या अ‍ॅडव्हॉन्स रकमेची कंत्राटदाराकडून वसुली झाली किंवा नाही, हे स्पष्ट नाही. कंत्राटदाराचे साहित्य साईडवर पडून होते. त्याच्या प्रमाणपत्रानुसार (एमआरसी) कंत्राटदाराला कोट्यवधींच्या रकमा दिल्या जात होत्या. मात्र कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने हे साहित्य कंत्राटदाराच्या अखत्यारीत साईडवर पडून होते. काही महिन्यातच वीज पारेषण कंपनीची परवानगी न घेता कंत्राटदारांनी हे साहित्य परस्परच साईडवरून गायब केल्याची माहिती आहे.पारेषणचे या कंत्राटदारांना दिलेल्या रकमेचे नुकसानही झाले आहे. या गंभीरबाबी बाबत खुद्द वीज नियामक आयोगालाही महापारेषण कंपनीने अंधारात ठेवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची आयोगाने सखोल चौकशी केल्यास ईपीसी करारात पारेषण कंपनीला कसे कोट्यवधींचे नुकसान झाले, हे सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. विशेष असे या प्रकरणात पारेषण कंपनीनेही संबंधित कंत्राटदार अथवा यंत्रणेविरुद्ध कठोर कारवाईची भूमिका घेतलेली नाही.

पारेषणला ९० कोटींचा महसुली नफावीज नियामक आयोगाने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पारेषण कंपनीला ३ हजार ७४४ कोटी ६९ लाखांच्या महसुली खर्चाला मंजुरी दिली. पारेषणचे महसुली उत्पन्न ३ हजार ८३४ कोटी ७५ लाख एवढे होणार असल्याचे नमूद आहे. त्यानुसार पारेषण कंपनी ९० कोटी सहा लाखाने फायद्यात राहणार आहे. मात्र कंपनीला ईपीसी करारातून झालेला तोटा कायम आहे.

टॅग्स :electricityवीज