नीलेश पारवेकरांची स्वप्नपूर्ती हीच का?
By Admin | Updated: October 11, 2014 23:14 IST2014-10-11T23:14:31+5:302014-10-11T23:14:31+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाला यवतमाळची उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला होता. प्रसंगी एबी फॉर्मवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिकाही घेतली होती. वास्तविक

नीलेश पारवेकरांची स्वप्नपूर्ती हीच का?
यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाला यवतमाळची उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला होता. प्रसंगी एबी फॉर्मवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिकाही घेतली होती. वास्तविक नंदिनी नीलेश पारवेकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र माणिकरावांच्या भूमिकेमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता ते नीलेश पारवेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मतांचा जोगवा मागत आहेत. नंदिनी पारवेकर यांचे तिकीट कापणे हीच नीलेश पारवेकरांची स्वप्नपूर्ती का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक सुमित बाजोरिया यांनी शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत काँग्रेसला जाब विचारला. ते म्हणाले, काँग्रेससोबत पालिकेतील एकही नगरसेवक नाही, ही बाब यावेळी प्रत्येकाचे नाव घेवून सांगण्यात आली. राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याने काँग्रेस उमेदवाराने धास्ती घेतली. त्यामुळे तथ्यहीन आरोप केले जात आहे. राष्ट्रवादीची माणिकरावांनी प्रत्येकवेळी अडवणूक केली.
राष्ट्रवादीने विकास केला नाही, असा आरोप केला जातो. ही बाब माणिकरावांनी स्वत: तपासून पाहावी. स्वत:च्या घरासमोरील रस्ताही ते करू शकले नाही तर मतदारसंघाचा विकास कसा करणार. त्यांनी बोदेगाव साखर कारखाना, बोरीअरब येथील सूतगिरणी सुरू केली तर या भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र ही बाबही ते करू शकले नाही. आमच्यावर धनदांडगे असल्याचा आरोप केला जातो. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. माणिकरावांकडे केवळ शेती उत्पादन होते. शेतीतून एवढे उत्पन्न होत असेल तर मग शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या. केवळ शेती उत्पादनातून ते मोठे झाले असेल तर सर्व शेतकऱ्यांना त्यांनी हे तंत्र सांगावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले. काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा माळवी, सुनील चमेडिया यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, सुरेश लोणकर, रमेश मानकर उपस्थित
होते.