नेर पोलिसांकडून वाहतुकदारांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:07 IST2018-01-02T22:07:21+5:302018-01-02T22:07:32+5:30

पोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले. मार्गातील विविध वाहने आणि चौकाचौकात थांबलेल्या वाहनांच्या चालकांना ठाणेदार अनिल किनगे यांच्या नेतृत्वात शुभेच्छापत्र देण्यात आले.

Welcoming the transporters from Ner police station | नेर पोलिसांकडून वाहतुकदारांचे स्वागत

नेर पोलिसांकडून वाहतुकदारांचे स्वागत

ठळक मुद्देपोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले. मार्गातील विविध वाहने आणि चौकाचौकात थांबलेल्या वाहनांच्या चालकांना ठाणेदार अनिल किनगे यांच्या नेतृत्वात शुभेच्छापत्र देण्यात आले.
पोलीस हा गणवेशातील नागरिक तर, नागरिक साध्या वेशातील पोलीस आहे. नववर्षात हे नातं अधिक घट्ट करून सामाजिक सुरक्षिततेसाठी सतर्क राहून कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा संकल्प करू या, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेची काळजी घेऊ या, गुन्हेगारी वा दहशतवादी घटनांकडे सतर्कपणे बघून पोलिसांना माहिती देऊन सुरक्षित समाज निर्मितीत हातभार लावण्याचा संकल्प नववर्षात करू या, असा संदेश या शुभेच्छापत्रात पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिला आहे.
शुभेच्छापत्र वाटपप्रसंगी ठाणेदार अनिल किनगे, गणेश इसळ, रमेश हिरुळकर, हरिचंद्र कार, रामभाऊ तिडके, महेश तडसे, नितीन कडुकार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Welcoming the transporters from Ner police station