नांदेकर यांचे जल्लोषात स्वागत

By Admin | Updated: July 12, 2015 02:37 IST2015-07-12T02:37:16+5:302015-07-12T02:37:16+5:30

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे शनिवारी वणीत आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

Welcome to Nandekar's Sankalok | नांदेकर यांचे जल्लोषात स्वागत

नांदेकर यांचे जल्लोषात स्वागत

शिवसेना जिल्हा प्रमुख : शहरातून वाजत-गाजत मिरवणूक
वणी : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे शनिवारी वणीत आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातून वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून तीन दिवसांपूर्वी माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर ते मुंबईतून शनिवारी जिल्ह्यात परतले. प्रथम यवतमाळात नांदेकर आणि दुसरे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले. त्यानंतर नांदेकर वणीकडे निघाले. यवतमाळ ते वणी दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. करंजी, मारेगाव येथेही त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शनिवारी दुपारी विश्वास नांदेकर वणीत दाखल झाले. त्यांनी प्रथम साई मंदिर चौकातील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हार्रापण केले. तेथे शिवसैनिकांनी ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
याप्रसंगी फाटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. तेथूनच त्यांची खुल्या जीपवर मिरवणूक काढण्यात आली. टिळक चौकात शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. तेथून मिरवणूक परत आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, सभापती सुधाकर गोरे, नगरपरिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, शहर प्रमुख, विभाग व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह युवासेनेचे प्रमोद मिलमिले, ललित लांजेवार, अभय सोमलकर, टीकाराम खाडे आदींसह शिवसैनिकांनी नांदेकर यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Nandekar's Sankalok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.