बाजार समिती निर्णयाचे शेतकरी संघटनेकडून स्वागत
By Admin | Updated: July 9, 2016 02:38 IST2016-07-09T02:38:21+5:302016-07-09T02:38:21+5:30
राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार समिती निर्णयाचे शेतकरी संघटनेकडून स्वागत
पुसद : राज्य शासनाने बाजार समितीच्या नियमातून फळे व भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
मुठभर लोकांच्या दबावाला बळी न पडता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. फळे आणि भाजीपाला शेताच्या बांधावर अथवा बाजार समिती आवाराच्या बाहेर किंवा ग्राहकाच्या दारात जाऊन थेट विक्री केली तर त्याला हरकत नसावी, अशा प्रकारे बाजार समितीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुर्ण पाठिंबा दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते, राजू डहाके, विश्वास लांडगे, नाना पुलाते, अमोल पाटील, दिनेश ठाकूर, बाबूलाल भट्टी, श्याम भाकरे, मुकींदराव खरात, बालाजी पुलाते, ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)