भारनियमनाने होरपळतेय जनता

By Admin | Updated: August 24, 2014 23:47 IST2014-08-24T23:47:50+5:302014-08-24T23:47:50+5:30

येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना

Weightlifting people | भारनियमनाने होरपळतेय जनता

भारनियमनाने होरपळतेय जनता

घोन्सा : येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना भारनियमनाचा चटका बसत आहे. दिवसभर लघु व्यवसाय ठप्प राहात असल्याने लघु व्यावसायीकांवर संक्रांत ओढवली आहे.
येथे महावितरणचे ३३ के़व्ही़ क्षमतेचे उपकेंद्र आहे़ या उपकेंद्रांतर्गत तीन फीडर येतात. त्यामध्ये साखरा, खडकडोह आणि सुसरी पेंढरी येथील फिडरचा समावेश आहे. या तीन फिडरअंतर्गत परिसरातील ३८ ते ४० गावे येतात़ मात्र या सर्व गावांना १० तासांच्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे़ महावितरणची गावठाण फीडर योजना अजूनपर्यंत कार्यान्वित न झाल्याने या भारनियमनामध्ये कोणताही बदल झालेला नाही़ तसेच ज्या गावांमध्ये ही गावठाण फिडरची योजना कार्यान्वित करण्यात आली, तेथे सुध्दा भारनियमन केले जात आहे. त्यामुळे गावठाण फीडर योजनेचा लाभ तरी काय, असा प्रश्न वीज ग्राहकांना प्रश्न पडत आहे़
सध्या भारनियमनाची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ वाजतापर्यंत आहे. परिणामी दिवसभर वीज नसते. त्यातच यावर्षी अद्याप अपुरा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला. सूर्य चांगलाच तापत आहे. तापणाऱ्या उन्हामुळे ग्रामस्थांचा जीव होरपळून निघत आहे़ कोरड्या वातावरणामुळे लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़
घोन्सा येथील वीज उपकेंद्र अनेक समस्यांचे माहेरघरच बनले आहे़ येथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सोयीसुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनातसुध्दा महावितरणप्रती प्रचंड चिड निर्माण झाली आहे़ त्यातच भारनियमन सलग असल्याने त्याचा मोठा फटका सर्वांनाच बसत आहे़ हे भारनियमन दोन टप्प्यात घेण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. महावितरणने याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Weightlifting people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.